प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 05:34 AM2023-12-17T05:34:04+5:302023-12-17T05:34:14+5:30
- त्रियुग नारायण तिवारी लोकमत न्यूज नेटवर्क अयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा ...
- त्रियुग नारायण तिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्यानगरी सुशोभित करण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतलेे आहे.
अयोध्या नगरीच्या विकासाचे नोडल अधिकारी, तसेच अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, रामजन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी चार कॉरिडॉर बनविण्यात येत असून, त्यांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रामपथ, रामजन्मभूमी पथ, भक्ति पथ, धर्म पथ अशी त्यांची नावे आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आता बांधून पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अयोध्येतील विमानतळ, अयोध्येतील रेल्वे स्थानकासहित ६ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण तसेच शिलान्यासही करतील.
३७ मंदिरांमध्ये भाविकांसाठी उत्तम सुविधा
nअयोध्येतील ३७ मंदिरांमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या मंदिरांच्या परिसरात भाविकांसाठी निवासाची सोय होईल. तसेच पाच टेन्ट सिटीची उभारणीही सुरू आहे.
nया शहरातील सर्व धर्मशाळांची दुरुस्ती तसेच साफसफाई करून तिथेही भाविकांच्या राहाण्याची सोय करण्यात येईल. २२ जानेवारीला राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ही जय्यत तयारी सुरू आहे.
धर्मपथावर असतील
तीन भव्य राम स्तंभ
अयोध्येतील धर्म पथावर तीन राम स्तंभ उभारण्यात येतील. तिथून काही अंतरावर भव्य स्वरूपाची स्वागतकमान उभारण्यात येणार आहे. त्या कमानीवर भगवान सूर्याचे शिल्प तयार करण्यात येईल. धर्म पथावर दोन्ही बाजूला ४५-४५ वॉल म्युरल असणार आहेत.
अयोध्येमध्ये भाविकांच्या निवासासाठी ५०० होम स्टेची सुविधा करण्यात आली आहे. अयोध्येतील हॉटेलांची निवासी क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उपाययोजना केल्या आहेत