राजपथावरील दिमाखदार संचलन संपले, लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन

By admin | Published: January 26, 2016 10:21 AM2016-01-26T10:21:08+5:302016-01-26T12:34:09+5:30

भारताच्या ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिमाखात पार पडले.

The spectacular circulation on the Rajpath was over, the army's strength was seen | राजपथावरील दिमाखदार संचलन संपले, लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन

राजपथावरील दिमाखदार संचलन संपले, लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिमाखात पार पडले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधा मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई ओलांद, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि देशाचे अनेक दिग्गज राजपथावर उपस्थित असून राजपथावर ध्वजसंचलन झाल्यानंतर ही परेड सुरू झाली. आजच्या या परेडचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी भारतीय लष्करासोबत फ्रान्सच्या लष्कराचे जवानही परेड करणार आहेत.  हे संचलन म्हणजे देशाचे लष्करी, सामर्थ्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान प्रगती अशा विविध क्षेत्रांचे प्रदर्शन असते.
दरम्यान आज सकाळी परेड सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अमर जवान ज्योती' येथे  देशासाठी जीवाची बाजी लावणा-या शहीदांना मानवंदना दिली. यावेली लष्कर, वायु दल आणि नौदलाचे प्रमुख तसेच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरही उपस्थित होते. 
 
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जाने १९५०  रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी रोजी सुरू होणारा हा उत्सव २९ जानेवारी रोजी ‘बीटिंग द रिट्रिट’ने संपतो
 
राजपथावर २६ वर्षांनी श्वानपथकाचे संचलन 
तब्बल २६ वर्षांनंतर या वर्षीच्या संचलनात श्वानपथकाच्या संचलनाचा समावेश करण्यात आला होता. जवानांसोबत पथसंचलनात सहभागी झालेल्या या स्कॉडमध्ये एकूण ३६ श्वान होते. या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेल्या चार महिन्यांपासून सराव करत होते.  
 
 
विविध राज्यांचे दिमाखदार चित्ररथ
राजपथावरील संचलनात जम्मू-काश्मीर, कर्नाटक, बिहार , राजस्थान, गोवा यासह अनेक राज्यांचे वैशिष्ट्य दाखवणारे चित्ररथ झळकले. त्यातून भारताच्या विविधतेचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या चित्ररथाचा मात्र यावेळी संचलनात समावेश नव्हता.
 
 
कर्नाटक
 
 
राजस्थानचा चित्ररथ
 
मध्य प्रदेश
 
 
बिहार

 

लष्कराच्या थरारक कवायती

 

 

Web Title: The spectacular circulation on the Rajpath was over, the army's strength was seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.