जम्मू-काश्मिरात हालचालींना वेग

By admin | Published: January 29, 2015 01:34 AM2015-01-29T01:34:05+5:302015-01-29T01:34:05+5:30

जम्मू काश्मिरात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी) आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या हातमिळवणीचे

Speed ​​of movement in Jammu-Kashmir | जम्मू-काश्मिरात हालचालींना वेग

जम्मू-काश्मिरात हालचालींना वेग

Next

जम्मू : जम्मू काश्मिरात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी) आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या हातमिळवणीचे संकेत मिळत आहेत़ आज बुधवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल एऩएऩ व्होरा यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा करून, सरकार स्थापनेसंदर्भातील चर्चेच्या प्रगतीबाबत त्यांना माहिती दिली़
सरकार स्थापनेसाठी भाजपासोबतच्या चर्चेचा जिम्मा सांभाळणारे पीडीपी आमदार हसीब द्राबू यांनी राज्यपालांची भेट घेतली़ त्यापूर्वी भाजपा सरचिटणीस राम माधव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले़ पीडीपी व भाजपा नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर राजभवनाने दोन वेगवेगळेबयान जारी केले़ सरकार पीडीपी-भाजपा यांच्यातील सत्ता स्थापनेसंदर्भातील चर्चेबाबत द्राबू आणि राम माधव यांनी राज्यपालांना माहिती दिली़ गत महिनाभरापासून भाजपची पीडीपीबरोबर सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू आहे आणि येत्या दिवसात व्यापक रूपरेषा तयार केली जाईल, असे या बयानात म्हटले आहे़ दरम्यान राज्यपालांना भेटल्यानंर द्राबू यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला़ माधव यांनी पीडीपीसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले़ पीडीपीसोबत भाजपाची चर्चा सुरू आहे़ चर्चा प्रगतिपथावर आहे़ दोन तीन मुद्यांवर वैचारिक मतभेद आहेत़ या मुद्यांवर चर्चा गरजेची आहे़

 

 

Web Title: Speed ​​of movement in Jammu-Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.