राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सुरक्षेची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी, त्या एसपीजीच्या संचालकांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:30 AM2023-09-06T10:30:54+5:302023-09-06T10:31:26+5:30
अरुण कुमार यांना कॅन्सर होता असे सांगितले जात आहे. दीर्घ काळापासून ते कॅन्सरशी लढा देत होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या सुरक्षेची ज्या सुरक्षा संस्थेवर जबाबदारी आहे, त्या एसपीजीच्या संचालकांचे आज दिल्लीत निधन झाले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांनी मेदांता हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
अरुण कुमार यांना कॅन्सर होता असे सांगितले जात आहे. दीर्घ काळापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. सिन्हा हे 1987 केरळ केडरचे IPS अधिकारी होते आणि 2016 पासून SPG संचालक म्हणून कार्यरत होते. सिन्हा यांनी झारखंडमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मोदी सरकारने त्यांचा कार्यकाळ मे महिन्यातच एक वर्षासाठी वाढविला होता. मोदींचे ते अत्यंत विश्वासू अधिकारी होते.
केरळ पोलिसांचे डीसीपी आयुक्त, तिरुअनंतपुरममध्ये इंटेलिजन्स आयजी आणि प्रशासन आयजी म्हणून काम केले. मालदीवचे अध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या हत्येप्रकरणीही त्यांनी तपास केला होता. या प्रकरणातील आरोपींना दिल्लीतून पकडले होते. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना ईमेलद्वारे धमकी देण्याचे प्रकरण आणि लेटर बॉम्ब प्रकरणातही त्यांनी यशस्वी तपास केला होता.