Video - घामाच्या धारा! स्पाइस जेटच्या विमानात तासभर AC बंद; अनेक प्रवाशांची बिघडली तब्येत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:11 PM2024-06-19T17:11:59+5:302024-06-19T17:13:28+5:30
दिल्ली ते दरभंगा फ्लाइट क्रमांक SG486 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागला आहे. कारण या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे एसी सुमारे तासभर बंद होता.
देशभरात उष्णता वाढत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली ते दरभंगा फ्लाइट क्रमांक SG486 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागला आहे. कारण या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे एसी सुमारे तासभर बंद होता. तो एक तास फ्लाइटमधील प्रवाशांसाठी अत्यंत वाईट अनुभव होता. घामामुळे ते हैराण झाले.
एएनआय या वृत्तसंस्थेने फ्लाइटमधील व्हिडीओ जारी केला आहे. गरमीमुळे विमानातील सर्वच प्रवासी खूप हैराण झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. लोकांना घाम येत आहे. ते स्वत:ला पेपरच्या मदतीने हवा घालत आहेत. मात्र या अशा परिस्थितीत कोणी काही करू शकत नाही. यामुळे काही जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची प्रकृती बिघडली.
#WATCH | SpiceJet passengers travelling from Delhi to Darbhanga (SG 476) had to wait inside an aircraft without air conditioning (AC) for over an hour amid the ongoing heatwave, with several feeling unwell. pic.twitter.com/cIj2Uu1SQT
— ANI (@ANI) June 19, 2024
विमानात गरमीमुळे हैराण झालेल्या लोकांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. एसी बंद असल्याने विमानातील लोकांची प्रकृती बिघडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक तिकीट किंवा इतर गोष्टी हातात घेऊन वारा घालत आहेत. सुमारे तासभर लोकांना एसी पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत थांबावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी विमानातील तापमान ४० डिग्रीच्या वर गेलं होतं.
फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो दिल्लीहून दरभंगा या फ्लाइटमध्ये चढला होता. दिल्ली विमानतळावर चेक-इन केल्यानंतर, फ्लाइटमध्ये एक तास AC चालूच झाले नाहीत. फ्लाइटमधील तापमान ४० डिग्री होतं. प्रवाशांचे गरमीमुळे खूप हाल होत होते. फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतरच एसी चालू झाला.