गोव्यातून उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या केबिनमधून धूर; हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:33 PM2022-10-13T13:33:18+5:302022-10-13T13:48:23+5:30

गोव्यातून उड्डाण घेतलेल्या स्पाइसजेट मधून धूर आल्यामुळे विमानाचे हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतले होते.

SpiceJet makes emergency landing in Hyderabad after smoke billows from cabin | गोव्यातून उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या केबिनमधून धूर; हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

गोव्यातून उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या केबिनमधून धूर; हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

googlenewsNext

हैदराबादमध्ये स्पाइसजेटच्या विमानातून धूर आल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतले होते. या विमानाच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागला, त्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केबिनमधून धूर येण्याची ही पाचवी घटना आहे. 

स्पाइसजेट SG 3735 या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतल्यानंतर वैमानिकाला केबिनमध्ये धूर दिसला, यावेळी त्याने लगेच याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. यानंतर या विमानाचे लगेच हैदराबाद येथील विमान तळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. 

 या स्पाइसजेटमध्ये एकुण ८६ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या विमानाने गोव्यातून ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतले आणि रात्री ११ वाजून ३० मिनिटांना हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. विमानतील धुरामुळे एका महिलेची तब्येत बिघडली आहे. या आपत्कालीन लँडिंगमुळे ९ विमानांचे दुसऱ्या शहरात लँडिंग करण्यात आले. यात दोन विमान आंतरराष्ट्रीय होते, तर ६ विमाने देशातील आणि एका कार्गो विमानाचा यात समावेश आहे.  

गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

विमानाच्या केबिनमधून धूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. याअगोदरही अशा घटना समोर आल्या आहेत. २६ सप्टेंबर रोजी दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला एका पक्षाने धडक दिली होती, त्यामुळे एअर इंडियाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. 

Web Title: SpiceJet makes emergency landing in Hyderabad after smoke billows from cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.