विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:41 PM2024-01-17T14:41:56+5:302024-01-17T14:42:39+5:30
मुंबई-बंगळुरू फ्लाईटमध्ये घडली घटना; कंपनीने परत केले तिकीटाचे पैसे.
SpiceJet Airlines: मागील काही दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्स चर्चेत आली होती. पण, आता स्पाइसजेट (SpiceJet) एअरलाइन्सची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे, मुंबईवरुन बंगळुरुला निघालेल्य फ्लाइटमधील एका महिला प्रवाशाला चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून प्रवास करावा लागला आहे. विमान बंगळुरुच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होईपर्यंत, म्हणजेच 1.30 तास ती महिला टॉयलेटमध्ये अडकू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्टाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-268 मध्ये मंगळवार(दि.16) मध्यरात्री/पहाटे 2 वाजता घडली. प्रवासी महिला टॉयलेटमध्ये गेली अन् तांत्रिक बिघाडामुळे टॉयलेटचे दार लॉक झाले. यामुळे तिला दिड तास बाहेर पडता आले नाही. अखेर विमान बंगळुरुत लँड झाल्यानंतर ग्राउंड स्टाफने टॉयलेटचा सकाळी 3.45 वाजता दरवाजा तोडून तिला बाहेर काढले.
महिलेला बाहेर काढल्यानंतर तातडीने प्रथमोपचारासाठी नेले. टॉयलेटमध्ये अडकून पडल्यामुळे महिला थोडी अस्वस्थ होती. दरम्यान, स्पाइसजेटने त्या प्रवाशाला तिच्या तिकिटाचा संपूर्ण खर्च परत केला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच इंडिगोच्या विमानात प्रवाशाने क्रु मेंबरला मारल्याची घटना घडली होती. या घटनेचीही सोशल मीडियावर खुप चर्चा झाली.