संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:45 AM2017-07-19T11:45:41+5:302017-07-19T11:45:41+5:30
कमी पैशांमध्ये चविष्ठ जेवणासाठी संसदेचं कॅन्टीन ओळखले जाते. मात्र मंगळवारी एका वरिष्ठ अधिका-याच्या जेवणाच्या ताटात कोळी आढळून आल्यानं कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - कमी पैशांमध्ये चविष्ठ जेवणासाठी संसदेचं कॅन्टीन ओळखले जाते. मात्र मंगळवारी एका वरिष्ठ अधिका-याच्या जेवणाच्या ताटात कोळी आढळून आल्यानं कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे संसदेचं कॅन्टीन जेवणावरुन वादात आले आहे. श्रीनिवासन असे या अधिका-याचे नाव आहे. यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी श्रीनिवासन यांनी संसदेच्या अन्न व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए.पी. जितेंद्र रेड्डी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. शिवाय, संसदीय व्यवहार राज्यमंत्री एस.एस अहलुवालिया यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. रेड्डी यांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यास सांगितले आहे. श्रीनिवासन यांनी संसदेच्या कॅन्टीनमधून पोंगल आणि दही भाताची ऑर्डर दिली होती. हे पदार्थ खात असताना श्रीनिवासन यांना जेवणात कोळी सापडला.
विशेष म्हणजे, संसदेच्या कॅन्टीनमध्ये दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदारांसोबत जेवण केले होते. त्यामुळे ज्या कॅन्टीनमध्ये खासदारांसह पंतप्रधान जेवण करतात, त्याच कॅन्टीनच्या जेवणात कोळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संसदेच्या कॅन्टीनमधील स्वच्छता व जेवणाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी बातम्या वाचा