CoronaVirus News: कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?; 'टास्क फोर्स'नं मोदी सरकारची मोठी चूक दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:03 PM2020-05-31T18:03:42+5:302020-05-31T18:05:59+5:30

कोविड-१९ टास्क फोर्सनं पंतप्रधान मोदींना दिला अहवाल

Spike in coronavirus cases could have been avoided says report kkg | CoronaVirus News: कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?; 'टास्क फोर्स'नं मोदी सरकारची मोठी चूक दाखवली

CoronaVirus News: कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?; 'टास्क फोर्स'नं मोदी सरकारची मोठी चूक दाखवली

googlenewsNext

नवी दिल्ली: लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वी मजुरांना त्यांची घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असती, तर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सध्या इतका वाढला नसता, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे हे तज्ज्ञ एम्स, जेएनयू, बीएचयूसारख्या अग्रगण्य संस्थांमधील असून त्यांचा समावेश कोविड-१९ टास्क फोर्समध्ये होतो.

देशातील कोरोना बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. मृतांचा आकडा ५ हजारांहून अधिक आहे. त्यावर कोविड-१९ टास्क फोर्सनं एक अहवाल दिला आहे. 'घरी परतणारे मजूर आता देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना विषाणू घेऊन जात आहेत. स्वगृही परतलेल्या मजुरांमुळे कोरोना ग्रामीण आणि निमशहरी भागांत पोहोचला आहे. त्यामुळे अतिशय कमी रुग्ण असलेल्या भागांतील रुग्णांची संख्या वाढ लागली आहे. आरोग्य व्यवस्था अतिशय कमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे,' असं टास्क फोर्सनं अहवालात नमूद केलं आहे.

कोविड-१९ टास्क फोर्समध्ये इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन ऑफ प्रीव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (आयएपीएसएम) आणि इंडियन असोसिशन ऑफ इपिडेमिओलॉजिस्ट (आयएई) या संघटनांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांनी तयार केलेला देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरील अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आला आहे.

देशात २५ मार्च ते ३० या कालावधीत अतिशय कठोर लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. २५ मार्चला देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६०६ इतकी होती. तीच संख्या २४ मे रोजी १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली, असं टास्क फोर्सनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. धोरणकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहिले. त्याची जबरदस्त किंमत आज देशाला मोजावी लागत आहे. यामुळे आरोग्य आणि मानवतेवरचं संकट आलं आहे, असंदेखील अहवालात म्हटलं आहे. 

राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्ध

मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली

नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत

पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड अन् रेल्वेसह उद्यापासून सहा नियम बदलणार, जाणून घ्या...

उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...

Web Title: Spike in coronavirus cases could have been avoided says report kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.