भुजबळ नॉलेज सिटीत पालक मेळावा

By admin | Published: August 26, 2015 12:18 AM2015-08-26T00:18:59+5:302015-08-26T00:18:59+5:30

नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी येथे पॉलिटेक्निकचा इंडक्शन व पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी इन्स्टट्यिूट ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य विजय भट, उपप्राचार्य राजेंद्र नारखेडे व प्रथम वर्ष को-ऑर्डिनेटर प्रोफेसर अनिल कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ होत्या.

Spinach Meet in Bhujbal Knowledge City | भुजबळ नॉलेज सिटीत पालक मेळावा

भुजबळ नॉलेज सिटीत पालक मेळावा

Next
शिक : भुजबळ नॉलेज सिटी येथे पॉलिटेक्निकचा इंडक्शन व पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी इन्स्टट्यिूट ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य विजय भट, उपप्राचार्य राजेंद्र नारखेडे व प्रथम वर्ष को-ऑर्डिनेटर प्रोफेसर अनिल कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ होत्या.
प्रा. अनिल कोकाटे यांनी इन्स्टट्यिूटची प्रास्ताविक व फॅकल्टीजची ओळख करून दिली. उपप्राचार्य प्रोफेसर राजेंद्र नारखेडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य विजय भट यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीचा विद्यार्थी सर्वांगीण विकासासह डॉक्टरेट होऊन बाहेर पडू शकतो, असे सांगून अभ्यासाबरोबर शिस्तप्रियता अत्यंत महत्त्वाची आहे, हे सांगितले. महाविद्यालयाची वैशिष्ट्येही त्यांनी सांगितली.
मुख्य प्रशासक शेफाली भुजबळ यांनी पालकांना सतत संपर्कात राहून पाल्याकडे लक्ष द्यावयासाठीचा आग्रह केला. संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी या कार्यक्रमास आपल्या शुभेच्छा कळविल्या. याप्रसंगी मागील वर्षातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी विलास कडेकर, ऋषभ राठोड, संजय मागल, महेश उखरडे, तुषार मोरे, हर्षल बोरगुडे, दामिनी निकुंभ, ऋषिकेश घुले यांचा गुणगौरव करण्यात आला.
फोटो ओळी-
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शेफाली भुजबळ. समवेत डावीकडून प्रा. अनिल कोकटे, प्राचार्य विजय भट व उपप्राचार्य प्रा. राजेंद्र नारखेडे. प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकवर्ग.

Web Title: Spinach Meet in Bhujbal Knowledge City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.