थुंकल्यास दंड ठोका!

By admin | Published: January 24, 2015 01:41 AM2015-01-24T01:41:52+5:302015-01-24T01:41:52+5:30

रस्त्यावरील थुंकण्यासह उघडयावर शौच करणाऱ्यास जरब बसावी म्हणून रग्गड रकमेचा दंड करण्याचा आग्रह राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केंद्राला केला आहे.

Spit the penalty! | थुंकल्यास दंड ठोका!

थुंकल्यास दंड ठोका!

Next

नवी दिल्ली : रस्त्यावरील थुंकण्यासह उघडयावर शौच करणाऱ्यास जरब बसावी म्हणून रग्गड रकमेचा दंड करण्याचा आग्रह राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केंद्राला केला आहे.
शहरात मुंबई पोलीस अधिनियम १९५१नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेस आहेत. पण ग्रामीण भागात अशी तरतूदच नसल्याने हा प्रस्ताव केंद्राला देणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विज्ञान भवनातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. वापरात नसलेले व नादुरूस्त असे सुमारे आठ लाख शौचालय राज्यात असून, त्यांच्या दुरूस्तीसाठी केंद्राने अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मातंर्गत मिळणारा निधी केंद्र शासनाकडून थेट न मिळता राज्याच्या वित्त विभागाकडून मिळत असल्यामुळे निधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Spit the penalty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.