सपात फूट! अखिलेश यांनी 235 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

By admin | Published: December 29, 2016 06:50 PM2016-12-29T18:50:52+5:302016-12-29T22:06:23+5:30

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Split boots! Akhilesh announced the first list of 235 candidates | सपात फूट! अखिलेश यांनी 235 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

सपात फूट! अखिलेश यांनी 235 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लखनऊमध्ये सकाळी सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे हे सर्वच उमेदवार सायकल चिन्हाऐवजी दुस-या वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. विशेष म्हणजे हे 235 उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव विरुद्ध मुलायम सिंग यादव असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मात्र समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहम्मद शाहिद यांच्या म्हणण्यानुसार पार्टीत कोणतेही मतभेद नाहीत आणि उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केली नाही. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी नेताजी(मुलायम सिंग यादव) यांना दिल्याची माहिती अखिलेश समर्थक सुनील साजन यांनी दिली आहे. समर्थकांची उमेदवारी कापल्यानेच अखिलेश यादव नाराज असून, त्यांनी मुलायम सिंग यादव यांना विचारणाही केली आहे. तसेच अखिलेशने समर्थकांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचाही सूचना दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी मंत्री आणि आमदारांशी चर्चा करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. मुलायम सिंग, शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान शिवपाल आणि अखिलेशमध्ये बाचाबाची झाल्याचीही माहिती आता समोर येत आहे. त्यामुळेच अखिलेश यांनी उमेदवारांची स्वतंत्र यादी तयारी केली आहे.

दरम्यान, मुलायम सिंग आमचे आदर्श आहेत मात्र जनतेला अखिलेश यादव यांची गरज आहे. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचलं जात आहे, असंही समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच अखिलेश समर्थक बृजलाल सोनकर म्हणाले, आम्हाला आमच्या विभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले असून, उमेदवारीची गरज नाही. आम्हाला अखिलेश यादवांना जिंकवायचं आहे. यादीची कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे एकंदरीत समाजवादी पक्षात निवडणुकीआधी मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Split boots! Akhilesh announced the first list of 235 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.