बॅडमिंटनपटूंच्या जोडीला 'खेलरत्न' सन्मान; मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:40 PM2023-12-20T16:40:14+5:302023-12-20T16:56:56+5:30
हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील.
नवी दिल्ली : यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील.
क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाईल. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.
दरम्यान, समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.
खेलरत्न पुरस्कार
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
सात्विक साईराज रँकीरेड्डी - बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे - धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी - धनुर्विद्या
श्रीशंकर - ऍथलेटिक्स
पारुल चौधरी - ऍथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन - बॉक्सर
आर वैशाली - बुद्धिबळ
मोहम्मद शमी - क्रिकेट
अनुष अग्रवाल - घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग - अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर - गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक - हॉकी
सुशीला चानू - हॉकी
पवन कुमार - कबड्डी
रितू नेगी - कबड्डी
नसरीन - खो-खो
पिंकी - लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर - शूटिंग
ईशा सिंग - शूटिंग
हरिंदर पाल सिंग - स्क्वॉश
अहिका मुखर्जी - टेबल टेनिस
सुनील कुमार - कुस्ती
अंतिम - कुस्ती
रोशिबिना देवी - वुशू
शीतल देवी - पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार - अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग