मित्राची नवी स्पोर्ट्स बाईक घेऊन 'ते' दोघे ट्रायलसाठी निघाले पण वेगाने घात केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:05 PM2022-11-30T15:05:03+5:302022-11-30T15:06:36+5:30

शुभम आणि सोनूचा मित्र यशने स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. यश बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. सगळे मित्र बाईकची ट्रायल घेत होते. सोनू आणि शुभम ट्रायल घेण्यासाठी निघाले. शुभम बाईक चालवत होता, तर सोनू मागे बसला होता.

sports bike speed 120 kmh indore madhya pradesh accident | मित्राची नवी स्पोर्ट्स बाईक घेऊन 'ते' दोघे ट्रायलसाठी निघाले पण वेगाने घात केला अन्...

फोटो - आजतक

Next

मध्य प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बाईकच्या ट्रायलवेळी एका तरुणाचा मृत्यू झाला. नव्या स्पोर्ट्स बाईकच्या ट्रायलसाठी दोन मित्र निघाले होते. त्यांनी भरधाव वेगात बाईक चालवली. यावेळी त्यांची बाईक डिव्हाइडरला धडकली. त्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेमावर रोड येथील तौल कांटच्या समोर रविवारी रात्री बाराच्या सुमारास बाईकचा भीषण अपघात झाला. यामध्ये सोनू चौहान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. बाईक चालवणाऱ्या शुभम राजपूतला दुखापत झाली आहे. सोनू कुरिअर कंपनीत काम करायचा. तर शुभम एका ठिकाणी मुनीम म्हणून कार्यरत आहे.

शुभम आणि सोनूचा मित्र यशने स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. यश बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. सगळे मित्र बाईकची ट्रायल घेत होते. सोनू आणि शुभम ट्रायल घेण्यासाठी निघाले. शुभम बाईक चालवत होता, तर सोनू मागे बसला होता. भरधाव वेगात असलेली बाईक डिव्हाइडरला धडकली. अपघातात सोनू गंभीर जखमी झाला होता आणि आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

मृत्यूबद्दल समजताच सोनूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. फेब्रुवारीत सोनूच्या बहिणीचं लग्न होतं. अपघाताबद्दल समजताच पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचली. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे सोनूचा मृत्यू झाला. बाईक अतिशय वेगात होती. शुभमचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हाइडरवर जाऊन आदळली अशी माहिती प्राथमिक तपासातून उघडकीस आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: sports bike speed 120 kmh indore madhya pradesh accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.