क्रीडा : कुंकळ्ळी युनियन, बेताळभाटी स्पोटींग कल्ब समोरासमोर

By admin | Published: September 11, 2015 09:24 PM2015-09-11T21:24:57+5:302015-09-11T21:24:57+5:30

दक्षिण गोवा यारी चषक स्पर्धेचा आज अंतिम सामना

Sports: Kumkalli Union, face-to-face spots | क्रीडा : कुंकळ्ळी युनियन, बेताळभाटी स्पोटींग कल्ब समोरासमोर

क्रीडा : कुंकळ्ळी युनियन, बेताळभाटी स्पोटींग कल्ब समोरासमोर

Next
्षिण गोवा यारी चषक स्पर्धेचा आज अंतिम सामना
मडगाव : दक्षिण गोवा यारी चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता कुंकळ्ळी युनियन व बेताळभाटी स्पोर्टिंग क्लब यांच्यात कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर शनिवार, दि़ 12 रोजी सायंकाळी 4.45 वाजता होणार आहे.
उपांत्य लढतीत कुंकळ्ळी युनियन संघाने स्पोर्टिंग क्लब ऑफ दवर्ली संघाला टायब्रेकरवर 7-5 गोलने पराभूत केले होते, तर बेताळभाटीच्या संघाने नावेली व्हिलेर्जस युनियन संघाचा 6-4 गोलने पराभव केलेला. कुंकळ्ळी युनियन संघाची मदार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या दौलत देसाई, क्लिफटॉन फर्नांडिस, अँडनी फर्नांडिस, कृष्णा शिरोडकर, सौरभ फातर्पेकर यांच्यावर, तर बेताळभाटी क्लिंटॉन फर्नांडिस व गॉडवीन फर्नांडिस यांच्यावर असणार आहे.
अंतिम सामन्याला कामगार मंत्री आवेर्तान फुर्तादो, कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक यांची उपस्थिती असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sports: Kumkalli Union, face-to-face spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.