ऑन दी स्पॉट जोड-२
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30
कामांचा दर्जा आयुक्तांनीच तपासावा
Next
क मांचा दर्जा आयुक्तांनीच तपासावामागील सिंहस्थ कुंभमेळ्यात अवघ्या बारा कोटी रुपयांत साधुग्रामची उभारणी करण्यात आली होती; शिवाय साधुग्रामसाठी कायमस्वरूपी मनपाच्या मालकीची ५४ एकर जागाही खरेदी करण्यात आली होती. यंदा सिंहस्थात शेतकर्यांऐवजी भूमाफियांना फायदा होईल अशा दृष्टीने प्रशासनाने खेळी करत भाडेपीने जागा मिळविल्या आहेत. सध्या ज्यांच्या जागा भाडेपीने घेण्यात आल्या आहेत त्यात दोन माजी महापौर आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याच्या जागेचा समावेश आहे. यंदाच्या सिंहस्थात कुठलेही नवीन काम हाती घेण्यात आलेले नसताना आणि जुन्याच रिंगरोडवर डांबर ओतले जात असताना शासनाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले जात आहेत. ज्या जागा सिंहस्थासाठी कायमस्वरूपी आरक्षित करणे अपेक्षित होते त्याठिकाणचे आरक्षण उठवणार्या तत्कालीन आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांची चौकशी केली पाहिजे. सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत आता आयुक्तांनीच निर्णय घ्यावा.- दशरथ पाटील, माजी महापौरप्रतिक्रियारस्त्याचे काम वरवरनांदूर नाका ते हॉटेल जत्रापर्यंतचा रस्ता मागील सिंहस्थात बांधण्यात आला. त्यानंतर रस्त्याची व्यवस्थित देखभाल झाली नाही. केवळ ठिगळे लावण्यातच महापालिकेने जबाबदारी सांभाळली. आताही रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. सदर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. - ज्ञानेश्वर पैठणकर, व्यावसायिकअपघातांचे प्रमाण वाढलेनांदूर नाका ते हॉटेल जत्रापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आजवर या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. रस्त्यावर पथदीप नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे; परंतु काम अपेक्षित असे होताना दिसून येत नाही. - निवृत्ती माळोदे, शेतकरीशेतकर्यांना न्याय मिळावासिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शेतकर्यांच्या जागा ताब्यात घेण्यात येत आहे. परंतु जागा ताब्यात घेताना शेतकर्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शेतकर्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यांना योग्य मोबदला मिळेल, याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. - दौलत दिंडे, शेतकरी फोटो कॅप्शन - १७ पीएचएफबी ८९साधुग्राममध्ये आखाड्यांसाठी उभारण्यात येणारे तकलादू स्वच्छतागृह.१७ पीएचएफबी ९२साधुग्राममध्ये अंतर्गत रस्ता तयार करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे.१७ पीएचएफबी ९७साधुग्राममध्ये आखाड्यांसाठी उभारण्यात येणार्या स्वच्छतागृहाला लावण्यात आलेले गळके पत्रे.१७ पीएचएफबी ८३नांदूर नाका ते हॉटेल जत्रा या दरम्यानच्या रस्त्याचे काम कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे व वरवरचे सुरू आहे, याचे प्रात्यक्षिक रस्ता खोदकाम करून दाखविताना शेतकरी.१७ पीएचएफबी ८१ज्ञानेश्वर पैठणकर१७ पीएचएफबी ८०निवृत्ती माळोदे१७ पीएचएफबी ७९दौलत दिंडे१७ पीएचएफबी ७८दशरथ पाटील१७ पीएचएफबी ७३तपोवन परिसरात पाटबंधारे खात्याकडून उभारण्यात येणारा अनावश्यक घाट.१७ पीएचएफबी ८५बा रिंगरोडवर साइडप्यांचे सुरू असलेले काम.