एस.पींनी खडसेंचे सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून काढले? मनीष भंगाळेचा सवाल : मुंबई एटीएसचा दबाव येत असल्याचा आरोप
By admin | Published: June 3, 2016 10:44 PM2016-06-03T22:44:02+5:302016-06-03T22:44:02+5:30
जळगाव: जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल करत या प्रकरणात सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दरम्यान, याप्रकरणात पंधरा दिवस काहीच हालचाली न करणारी एटीएस आता स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचेही भंगाळे म्हणाला.
Next
ज गाव: जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल करत या प्रकरणात सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दरम्यान, याप्रकरणात पंधरा दिवस काहीच हालचाली न करणारी एटीएस आता स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचेही भंगाळे म्हणाला.जिल्हा पत्रकारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भंगाळे याने दाऊदच्या कराची येथील निवासस्थानावरुन खडसेंना आलेल्या कॉल्सची माहिती दाखवून त्याचा डेमो सादर केला. दाऊदच्या पत्नीच्या क्रमांकावरून खडसेंच्या मोबाईलवर सात वेळा संभाषण झाले आहे. यावेळी मार्च व एप्रिलचे बील त्याने दाखविले. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे भंगाळे याने सांगितले.ई-मेलचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्नगेल्या तीन दिवसापासून दररोज रात्री दहा वाजता माझ्या ई-मेल आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न कोणाकडून तरी केला जात आहे. याबाबत मी मुंबई पोलिसांना विचारणा केली असता आमच्याकडून असा प्रयत्न होत नाही. गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्याकडून हा पासवर्ड घेऊ शकतो, असे उत्तर मला देण्यात आले. एकूण तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भंगाळे म्हणाला.खडसे मंत्री असल्याने कारवाईस विलंबआंतरराष्ट्रीय कॉल्सचे प्रकरण देशाशी निगडित विषय असताना, खडसे हे केवळ मंत्री व सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्यावर कारवाईस विलंब होत आहे. तसेच पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी देशहिताच्या दृष्टिकोनातून सीडीआर काढले असते तर मग एकट्या खडसेंचेच का? अन्य चार जणांचे का नाही काढले. हे प्रकरण मुंबई सुरू असताना जळगावात त्याची तक्रार अथवा गुन्हाही दाखल नाही, याचाच अर्थ खडसेंना वाचविण्यासाठीच सुपेकरांनी हे सीडीआर काढले असा आरोप भंगाळे याने केला.