मराठवाड्यात पावसाचा शिडकावा
By admin | Published: September 5, 2015 12:36 AM2015-09-05T00:36:27+5:302015-09-05T00:36:27+5:30
विदर्भात तुरळक : कोकण, मध्य महाराष्ट्र कोरडाच
Next
व दर्भात तुरळक : कोकण, मध्य महाराष्ट्र कोरडाचपुणे : यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवलेली आहे, मात्र गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे विदर्भातही पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. विदर्भातील लोणार येथे सर्वाधिक ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मात्र मध्य महाराष्ट्रात अद्यापही पावसाची ओढ लागली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात जोरदार पावसााची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.मराठवाड्यात आतापर्यंत तुरळक पाऊस पडला आहे. मात्र मागील २४ तासांत पावसाने मराठवाड्यातील भोकरदन, देगलूर, जाफराबाद, परतूर, सिल्लोड, वसमत येथे प्रत्येकी २० मिमी तर अहमदपूर, जालना, किनवट, मुखेड, फुलंब्री, पूर्णा, सोएगाव येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून विदर्भातून गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भात लोणार येथे ५० मिमी तर जळगाव जामोद, मेहकर प्रत्येकी ३० मिमी,बुलढाणा, देऊळगाव राजा, खामगाव, मुलचेरा, नांदुरा, राजुरा, संग्रामपूर येथे प्रत्येकी २० मिमी तर चिखली, मोताळा, रिसोड, सिंदखेडराजा, तेल्हारा या ठिकाणी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला नाही. येत्या २४ तासांत राज्यात मराठवाड्यातील बर्याच ठिकाणी, कोकण, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तसेच पुणे व पुण्याच्या आसपासच्या परिसरात तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.