स्वरचैतन्याची शिंपण जोड १

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:49+5:302015-02-14T23:51:49+5:30

संतूरवादनाची आगळी अनुभूती

Sprinkler Spinach 1 | स्वरचैतन्याची शिंपण जोड १

स्वरचैतन्याची शिंपण जोड १

googlenewsNext
तूरवादनाची आगळी अनुभूती
कार्यक्रमाचा समारोप पं. सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने झाला. त्यांनी आधी पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंडितजींशी माझे अत्यंत निकटचे संबंध होते. माझे वडील पं. सी. आर. व्यास व पंडितजी हे समकालीन गायक. त्यामुळे या व्यासपीठावर आसनस्थ झाल्यानंतर पंडितजींच्या एवढ्या आठवणी मनात दाटून आल्या की, त्या सांगण्यासाठी वेगळा कार्यक्रम करावा लागेल, असे ते उद्गारताच सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले. नाशिककरांच्या रसिकतेचेही त्यांनी तोंड भरून कौतुक केले. पं. व्यास यांनी कौशिक ध्वनी रागाने वादनाला प्रारंभ केला. त्यानंतर भिन्न षड्ज रागात आलाप व विलंबित, मध्य व द्रुत या तीनतालातीलरचना सादर केल्या. संतूरवर फिरणार्‍या दोन कांड्या अन् त्यातून निर्माण होणारी जादुई स्वरमालिका रसिकांना आगळी अनुभूती देऊन गेली.

इन्फो :
आज जीवनगौरव
या महोत्सवात उद्या (दि. १५) सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पं. जसराज यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. अत्रे यांच्या शिष्यांचे गायन रंगणार आहे. याशिवाय सायंकाळीही गौरी करंबेळकर यांचे गायन, सहाना बॅनर्जी यांचे सतारवादन व जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन ऐकायला मिळणार आहे.

फोटो कॅप्शन :
पान १ साठी
फोटो क्र. १४ पीएचएफबी १२६
अविस्मरणीय स्वरशिंपण...
पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाला शनिवारी महाकवी कालिदास कलामंदिरात प्रारंभ झाला. या महोत्सवात गायन करताना मंजूषा कुलकर्णी-पाटील. त्यांना संगीतसाथ देताना रोहित मुजुमदार (तबला), स्वराली पणशीकर, अमृता जाधव (तानपुरा) व सुयोग कुंडलकर (संवादिनी). (संबंधित वृत्त : पान २ वर)

फोटो कॅप्शन
पान २ साठी...
१४ पीएचएफबी १२३
पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना पं. काकासाहेब घारापूरकर. समवेत अजय आंबेकर व जयप्रकाश जातेगावकर.
१४ पीएचएफबी १२४
बासरीवादन करताना निरंजन भालेराव.
१४ पीएचएफबी १२७
संतूरवादन करताना पं. सतीश व्यास.

Web Title: Sprinkler Spinach 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.