महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:06 PM2023-01-09T12:06:14+5:302023-01-09T12:06:21+5:30
सातत्याने वाढत्या महागाईमुळे जेवणही खिसा रिकामा करीत आहे.
नवी दिल्ली : यंदा ब्रिटनने सर्वाधिक भारतीयांना विद्यार्थी व्हीसा जारी केले आहेत. मात्र, वाढलेली महागाई आणि पाउंडचे मूल्य यासारख्या घटकांमुळे या विद्यार्थ्यांचे तेथे जगणेच अवघड झाले आहे.विद्यार्थी आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जे विद्यार्थी अलीकडेच ब्रिटनमध्ये गेले आहेत, त्यांची सर्वाधिक अडचण झाली आहे. संकट केवळ परवडणारे घर शाेधण्यापुरते मर्यादित नाही. सातत्याने वाढत्या महागाईमुळे जेवणही खिसा रिकामा करीत आहे.
४ दिवसही तेवढे पैसे पुरत नाहीत
रिया जैन हिने सात वर्षांपूर्वी ब्रिटनमध्येच पदवी घेतली हाेती. आत पुढील शिक्षणासाठी तिने पुन्हा ब्रिटनलाच निवडले आहे. ७ वर्षांपूर्वी मला २ आठवड्यात जेवणासाठी जेवढा खर्च येत हाेता, ताे आता ४ दिवसही पुरत नाही.
या देशांनाच सर्वाधिक पसंती
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पसंती अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना सर्वाधिक पसंत असते. इटली, जर्मनी, तुर्की, युएई आणि मलेशिया या यादीत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या पसंतीमध्ये माेठ्या प्रमाणावर बदल हाेण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.