Sputnik V in India: आता अपोलो रुग्णालयांत मिळणार स्पुटनिक लस; डॉ. रेड्डी लॅबसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:50 PM2021-05-18T12:50:04+5:302021-05-18T12:51:57+5:30
Sputnik V In India : CoWIN मध्येही सुरु करण्यास आलं स्पुटनिक लसीसाठी रजिस्ट्रेशन
देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा त्यावरील एक पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आता १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. दरम्यान, आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) ही लसदेखील देण्यात येणार आहे. दरम्यान, ओपोलो रुग्णालय आमि डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरिजनं 'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणासाठी करार करत असल्याची माहिती सोमवारी देण्यातआली. या लसीकरण कार्यक्रमाचा पहिला टप्पा सोमवारी हैदराबादमध्ये लसीकरणापासून सुरू करण्यात आला. लसीकरणादरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाईल आणि याचं रजिस्ट्रेशन CoWIN मध्येही असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
"पायलट टप्प्यात डॉ. रेड्डीज आणि अपोलो व्यवस्थापन, तसंच कोल्ड चेन लॉजिस्टिकचं परिक्षण आणि लाँच करण्याची तयारी करतील," अशी माहिती अपोलो रुग्णालयांच्या रुग्णालय विभागाचे अध्यक्ष के. हरी प्रसाद यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं. तसंच स्पुटनिकद्वारे कोरोना लसीची उपलब्धता आणि पोहोच सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासगी क्षेत्रांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच खासगी क्षेत्रालाही लस खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती
आपल्या ठिकाणीदेखील लसीकरण करण्यात यावं यासाठी आपण कॉर्पोरेटसोबतही चर्चा करत आहोत, असंही प्रसाद म्हणाले. सध्या देशात ६० ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. याणध्ये अपोलो हॉस्पीटल, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटल आणि अपोलो क्लिनिक यांचा समावेश असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"आमचे दोन प्रकल्प पायलट प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी काम करत होते. याचा उद्देश शक्य तितक्या मोठ्या प्रमाणआत भारतीयांचं लसीकरण करणं हे होतं," अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे सीईओ ब्रांडेड मार्केट्स एम.व्ही.रामणा यांनी दिली.