Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:06 PM2021-05-14T13:06:20+5:302021-05-14T13:18:32+5:30
Russia's Sputnik V vaccine Price in India: स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली.
Russia's Sputnik V vaccine Price in India: रशियाची कोरोना व्हायरसवरील लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) ची भारतातील किंमत (Indian Price declaired) जाहीर झाली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषधनिर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक ईन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. (Sputnik V vaccine priced at Rs 995 per dose in India, first shot administered by Dr Reddy's in Hyderabad)
अदार पुनावालांना Covishield मालामाल करणार; सीरम इन्स्टिट्यूट किती फायद्यात? अंदाज पहा...
स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.
रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे.
भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा रशियाची लस जास्त परिणामकारक आहे.
First doses of Sputnik V administered in India. Deepak Sapra, Global Head of Custom Pharma Services at Dr Reddy's Laboratories receives the first jab of the vaccine in Hyderabad: Sputnik V#COVID19pic.twitter.com/95eOT6gGWR
— ANI (@ANI) May 14, 2021
रशियात तयार झालेली स्पुतनिक लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारांत उपलब्ध होईल. नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबद्दलची माहिती दिली. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं विविध स्तरांवर काम करत आहोत. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत २१६ कोटी डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोवॅक्सिनच्या ५५ कोटी डोस, कोविशील्डच्या ७५ कोटी डोस, बायो ई सब युनिट लसीचे ३० कोटी डोस, झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस, नोवावॅक्सिनचे २० कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेझल लसीचे १० कोटी डोस, जिनोवाचे ६ कोटी डोस आणि स्पुटनिकच्या १५ कोटी डोसचा समावेश असेल. याशिवाय आणखी देशांमधील लसीदेखील भारतात येतील, अशी माहिती पॉल यांनी दिली.