Sputnik V: 'स्पुतनिक व्ही'ची लस अपोलो हॉस्पिटलमध्ये मिळणार; प्रशासनाने जाहीर केली 'वेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:49 PM2021-05-27T18:49:13+5:302021-05-27T18:50:12+5:30
Sputnik V Vaccination Availability: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे.
Sputnik V Vaccination: देशात कोरोना लसीकरणासाठी रशियाच्या तिसऱ्या लशीला परवानगी मिळाली आहे. ही स्पुतनिक व्ही लस देशभरातील अपोलो हॉस्पिटल्समध्ये (Apollo Hospitals ) दिली जाणार असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे उपाध्यक्ष शोभना कमिनेनी यांनी दिली आहे. (Sputnik V, the third vaccine approved in India will be available through the Apollo Hospitals from the 2nd week of June)
Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणार
रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. पॅनेसिया वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे. स्पुतनिक व्ही लस ही कोरोनाविरोधात अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sputnik V, the third vaccine approved in India will be available through the Apollo Hospitals from the 2nd week of June: Shobana Kamineni, Executive Vice-chairperson, Apollo Hospitals
— ANI (@ANI) May 27, 2021
रशियाची सॉवरन वेल्थ फंड रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या लसीसाठी फंडिंग करते. भारतातील पाच कंपन्यांसोबत लसीच्या उत्पादनासाठी करार करण्यात आला आहे. भारताला या लसीचे आतापर्यंत 2,10,000 डोस मिळाले आहेत. मे अखेरीस 30 लाख डोस मिळणार आहेत, तर जूनमध्ये ही संख्या वाढून 50 लाख होणार आहे.
Gujarat | Apollo Hospital launches a drive-in vaccination programme in Ahmedabad.
— ANI (@ANI) May 27, 2021
We will vaccinate 1,000 people with Covishield every day. It will cost Rs 1,000 per beneficiary. We can improve herd immunity with mass vaccination: Dr Balaji Pillai, COO, Apollo Hospital pic.twitter.com/CuLSx2lu0U
तर दुसरीकडे अहमदाबादच्या अपोलोमध्ये कोव्हिशिल्डची लस आजपासून देण्यास सुरुवात झाली आहे. एका लसीसाठी 1000 रुपये आकारले जात आहेत. दिवसाला 1000 लोकांना ही लस दिली जाणार आहे, असे तेथील हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बालाजी पिल्लई यांनी सांगितले.