'तो' पक्षी बांगलादेशचा बतख; पाकिस्तानचा हेर असल्याच्या संशयावर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 06:43 PM2019-05-03T18:43:44+5:302019-05-03T18:44:45+5:30
आज सकाळी एक वेगळी घटना घडली होती. वैशालीच्या महनार ठाण्याच्या हसनपूर गावाच्या बाहेर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तेथील स्थानिक पक्ष्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला चोचीने बोचकारून घायाळ करण्यात आले.
पटना : पंखामध्ये यंत्र लावलेला पक्षी सापडल्याने बिहारमध्ये खळबळ माजली होती. हा पक्षी पाकिस्तानने हेरगिरी करण्यासाठी पाठविल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी लावला होता. मात्र, चौकशीअंती हा पक्षी बांगलादेशचा असल्याचे समोर आले आहे. तसेच हेरगिरीसाठी नाही तर रिसर्चसाठी सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांना सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आज सकाळी एक वेगळी घटना घडली होती. वैशालीच्या महनार ठाण्याच्या हसनपूर गावाच्या बाहेर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तेथील स्थानिक पक्ष्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला चोचीने बोचकारून घायाळ करण्यात आले. यामध्ये त्याचा जीव गेला. मात्र, य़ा पक्ष्यावर लावलेले यंत्र पाहून गावकऱ्यांना वेगळाच संशय आला. हेरगिरी करण्यासाठी हा पक्षी पाकिस्तानने सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. हा पक्षी पोलिसांना ताब्यात घेऊन वनविभागाला दिला होता.
आकाशात चाललेली पक्ष्यांची लढाई पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली. जवळपास अर्धा तास ही झुंज सुरु होती. शेवटी हा पक्षी एकटा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्या पक्ष्याच्या शरीरावर यंत्र लावलेले दिसले, तसेच पायामध्ये पितळेचा टॅगही होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे यंत्र लावलेले पक्षी पाकिस्तानातून हेरगिरीसाठी येतात. आंतरराष्ट्रीय सीमेवरील राजस्थानच्या जैसलमेरसारख्या जिल्ह्यांमध्ये ते दिसतात.
मात्र, तपासानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या पक्ष्याला 2009 मध्ये संशोधनासाठी ट्रान्समीटर लावण्यात आला होता. मात्र, 1 मे 2019 पासून या पक्ष्याचा काहीच माग काढता येत नव्हता. पाकिस्तानचा हेर पक्षी मृत झाल्याचे वृत्त कळल्यानंतर बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना पोलिसांशी संपर्क साधून खरी माहिती दिली.