चिनी युद्धनौकेद्वारे भारताची हेरगिरी! संरक्षण तज्ज्ञांचा दावा; क्षेपणास्त्र चाचण्यांचा घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:49 AM2022-11-07T07:49:57+5:302022-11-07T07:50:56+5:30

भारताने एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची व त्यानंतर दहा दिवसांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली.

Spying on India by Chinese warship Defense experts claim Missile tests took off | चिनी युद्धनौकेद्वारे भारताची हेरगिरी! संरक्षण तज्ज्ञांचा दावा; क्षेपणास्त्र चाचण्यांचा घेतला धसका

चिनी युद्धनौकेद्वारे भारताची हेरगिरी! संरक्षण तज्ज्ञांचा दावा; क्षेपणास्त्र चाचण्यांचा घेतला धसका

googlenewsNext

नवी दिल्ली :

भारताने एका इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची व त्यानंतर दहा दिवसांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्रांमुळे चीनची सर्व शहरे भारताच्या माऱ्याच्या टप्प्यात आली आहेत. त्यामुळे चीनने भारताच्या हेरगिरीसाठी युआन वांग-६ ही युद्धनौका इंडोनेशियानजीक हिंद महासागरात तैनात केली आहे, असा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.

अशीच एक युद्धनौका चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरामध्ये पाठविली होती. त्यावेळी ती त्यास भारताने विरोध केला होता. युआन वांग-५ युद्धनौका बाली बेटानजीक आणण्याचा तसेच चीनने नवा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा कालावधी  सारखाच आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींवर भारताने अधिक लक्ष ठेवावे असे सायमन यांनी म्हटले आहे.

के-४ क्षेपणास्त्र अरिहंत पाणबुडीवर होणार तैनात
भारताचे के-४ या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वी होत आहेत. साडेतीन हजार किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राद्वारे चीनवर भारताला हल्ला करता येणे शक्य आहे. हे क्षेपणास्त्र आयएनएस अरिहंत या पाणबुडीवर तैनात केले जाणार आहे.

Web Title: Spying on India by Chinese warship Defense experts claim Missile tests took off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन