सादरे प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक पुन्हा जळगावात

By admin | Published: October 28, 2015 12:05 AM2015-10-28T00:05:58+5:302015-10-28T00:05:58+5:30

मुख्य पान १ साठी

The squad for the investigation of Sadar case, again in Jalgaon | सादरे प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक पुन्हा जळगावात

सादरे प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक पुन्हा जळगावात

Next
ख्य पान १ साठी

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांचे पथक मंगळवारी पुन्हा जळगावात दाखल झाले. अजिंठा विश्रामगृहात त्यांनी रामानंद नगरच्या अकरा पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब घेतले. तब्बल १० तास त्यांचे कामकाज सुरु होते.
यापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचे पथक जळगावात आले होते. त्यांच्याकडून त्यावेळी सादरे प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी हे पथक पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. पोलीस अधीक्षक कार्यालय व रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती माहिती घेऊन थेट अजिंठा विश्रामगृह गाठले. तेथे त्यांनी सादरे यांनी वाळूच्या डंपरवर कारवाईसाठी ज्या कर्मचार्‍यांना पाठविले होते त्या पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले.
दरम्यान, वाळू व्यावसायिक सागर चौधरी याच्याविरुद्ध दाखल असलेले गुन्हे व त्याने दिलेल्या तक्रारीची माहितीही घेण्यात येत होती.

Web Title: The squad for the investigation of Sadar case, again in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.