स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्क्वॅशपटूने किडनी विक्रीला काढली
By admin | Published: January 12, 2016 02:13 PM2016-01-12T14:13:20+5:302016-01-12T15:17:28+5:30
दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने भारताच्या राष्ट्रीय स्क्वॅशपटूने त्याची किडनी विक्रीसाठी काढली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने भारताच्या राष्ट्रीय स्क्वॅशपटूने त्याची किडनी विक्रीसाठी काढली आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रवी दिक्षित असे या स्क्वॅशपटूचे नाव असून, त्याने २०१० मध्ये आशियाई ज्युनियर स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळवले होते.
२३ वर्षांचा रवी उत्तरप्रदेश धामपूर येथील निवासी असून, त्याने सोशल मीडीयावर किडनी विकायला काढल्याची जाहीरात दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात गुवहाटी येथे होणा-या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी चार स्क्वॅशपटूची निवड झाली आहे. त्यात रवीचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रायोजक मिळत नसल्याने निराश झालेल्या रवीने फेसबुक आणि टिवटरवर किडनीची किंमत आठ लाख रुपये ठेवली आहे.
रवीला आतापर्यंत त्याचे वडिल नोकरी करत असलेल्या धामपूर साखर कारखान्यातून आर्थिक मदत मिळाली आहे. प्रशिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याला स्पर्धा जिंकल्यानंतर जी रक्कम मिळते त्यावर अवलंबून रहावे लागते.
मला दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त एक लाख रुपयांची गरज आहे पण त्यासाठीही प्रायोजक मिळत नाहीय. त्यामुळे मी किडनी विकून आठ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन दुस-या स्पर्धांसाठी मला पुन्हा प्रायोजकांवर अवलंबून रहावे लागणार नाही असे रवीने सांगितले.