श्रीलंका आणि जर्मनीचाही भारताला पाठिंबा

By admin | Published: October 5, 2016 04:47 PM2016-10-05T16:47:45+5:302016-10-05T16:54:39+5:30

उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला समर्थन देत रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी गरज असलेली सर्व पावलं उचलली आहेत असं सांगत कौतुक केलं

Sri Lanka and Germany also support India | श्रीलंका आणि जर्मनीचाही भारताला पाठिंबा

श्रीलंका आणि जर्मनीचाही भारताला पाठिंबा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सीमारेषेपलीकडचा दहशतवाद हा मुख्य मुद्दा असून सार्क देशांनी यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला समर्थन देत रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी गरज असलेली सर्व पावलं उचलली आहेत असं सांगत कौतुक केलं. तसंच युद्द हा पर्याय नसल्याचंही रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत. 
 
चीनसोबत आमचे व्यवहारिक संबंध असून कोणतेही लष्करी संबंध नसल्याचं रानिल विक्रमसिंघे यांनी यावेळी स्पष्ट केलं. याअगोदर नेपाळनेही सार्क देशांनी आपल्या भुमीचा उपयोग दहशतवादासाठी करु नये असं आवाहन केलं होतं. भारत आणि इतर देशांनी सार्कमध्ये सहभागी न होण्याची भुमिका घेतल्यानंतर इस्लमाबादमधील आयोजित सार्क परिषद रद्द करण्यात आली होती. 
 
जर्मनीनेही भारताच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला असून ' आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे कोणत्याही देशाला दहशतवादापासून स्वत:ला वाचवण्याचा हक्क आहे', असं  जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन ने यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Sri Lanka and Germany also support India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.