Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:37 PM2022-07-10T14:37:23+5:302022-07-10T14:38:08+5:30

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत.

Sri Lanka Crisis: 'We stand firmly behind Sri Lanka', India's first reaction to Sri Lanka crisis | Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Next

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की, त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. आर्थिक संकटामुळे गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असलेला श्रीलंकेचा मित्र भारत आज पुन्हा त्याच्या पाठीशी उभा आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, आता पुढे काय होईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

कोणत्याही देशाने मदत केली नाही
श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तांनी एक निवेदन दिले आहे, या विषम परिस्थितीतही भारत आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडेल आणि आज आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आर्थिक संकट आणि हिंसक निषेध असूनही जगातील कोणत्याही देशाने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला नाही. पण, भारताने आपले मोठे मन दाखवले आहे आणि श्रीलंकेला सर्व प्रकारे मदत करणार, असे त्यांनी सांगितले.

सर्व कॅबिनेटचा राजीनामा
शनिवारपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. आता विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री एक एक करून राजीनामे देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपला राजीनामा सादर करतील.

Web Title: Sri Lanka Crisis: 'We stand firmly behind Sri Lanka', India's first reaction to Sri Lanka crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.