Sri Lanka : धक्कादायक! श्रीलंकेनं भारताचे 12 मच्छीमार पकडले, जामिनासाठी मागितले प्रत्येकी 1 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 04:45 PM2022-04-09T16:45:13+5:302022-04-09T16:46:20+5:30
जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने नुकतेच रामेश्वरम येथे जवळपास 12 मच्छिमारांना अटक केली होती. आता श्रीलंकेच्या न्यायालयाने त्यांच्या सुटकेची रक्कम 1-1 कोटी रुपये निश्चित केल्याचे वृत्त आहे. मात्र, श्रीलंकन न्यायालयाच्या या निर्णयावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोक भारतात येत आहेत. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वतंत्र्य मिळाले. तेव्हापासून आतापर्यंतचा विचार करता, सध्या श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
The News Minute ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल मेकॅनाइज्ड असोसिएशनचे अध्यक्ष पी जेसुराज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “न्यायालयाने या मच्छीमारांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये एवढी रक्कम निर्धारितकेली आहे. हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. एक मच्छीमार 1 कोटी कसा उभा करू शकतो? जर त्याच्याकडे एवढे पैसे असते, तर तो या व्यवसायात आलाच नसता.
जेसुराज यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 85 भारतीय नौका अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनीही न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, रामेश्वरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष देवदास म्हणाले, "भारत आणि श्रीलंका यांचे चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. असे असतानाही, आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या मच्छिमारांना, अशी वागणूक देणारा श्रीलंकेशिवाय दुसरा देश नाही, असे दिसते. भारत सरकार याकडे केवळ प्रेक्षक बणून बघत आहे का? आपल्या मच्छिमारांना श्रीलंकेने पकडले आणि तेही भारताचे परराष्ट्र मंत्री तेथे राजकीय दौऱ्यावर असताना. महत्वाचे म्हणजे, सोडण्यासाठी मागितलेली रक्कम ही जखमेवर मिठ चोळल्यासारखी आहे. मासेमारीवर वार्षिक बंदी येत आहे, डिझेलच्या वाढत्या किमतींनी मासेमारीचा दरही वाढला आहे आणि आता हे.'