श्रीलंकेने ७७ भारतीय मच्छीमारांची केली सुटका
By admin | Published: March 14, 2017 11:26 PM2017-03-14T23:26:32+5:302017-03-14T23:26:32+5:30
श्रीलंकेने ७७ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारतानेही श्रीलंकेच्या १२ मच्छीमारांची मायदेशी रवानगी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
रामेश्वरम, दि. 14 - श्रीलंकेने ७७ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारतानेही श्रीलंकेच्या १२ मच्छीमारांची मायदेशी रवानगी केली आहे.
गेल्या मागच्या आठवड्यात एका भारतीय मच्छीमाराला ठार करण्यात आल्याच्या घटनेमुळे दोन्ही देशांत निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने गेल्या दोन महिन्यांत तामिळनाडूतील ७७ भारतीय मच्छीमारांची सुटका करून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दलाच्या हवाली केले. तर, भारतानेही १० मार्च रोजी चेन्नईतील पुझल तुरुंगातून श्रीलंकेच्या १२ मच्छीमारांची सुटका करून त्यांना श्रीलंकन नौदलाच्या हवाली केले.