श्रीनगर विमानतळावर ग्रेनेडसहित जवानाला अटक
By admin | Published: April 3, 2017 10:01 AM2017-04-03T10:01:24+5:302017-04-03T10:14:09+5:30
श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील तपासणीदरम्यान त्याच्या सामानात चक्क दोन ग्रेनेड आढळून आले.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील तपासणीदरम्यान त्याच्या सामानात चक्क दोन ग्रेनेड आढळून आले. हा जवान नियंत्रण रेषेजवळ तैनात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला जवान दिल्लीसाठी रवाना होत होता. त्यावेळी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यात दोन ग्रेनेड आढळून आले. यानंतर जवानाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिका-यानंच हे ग्रेनेड दिल्याचं या जवानाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. विमान प्रवासादरम्यान एका जवानानं सोबत ग्रेनेड घेऊन जाणं, यामागे काही कट कारस्थान आहे का, या बाजूनं पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा जवान एका स्पेशल चार्टर्ड प्लेननं दिल्लीत दाखल होणार होता. याच विमानातून लष्कराचे अन्य जवानही दिल्लीकडे येणार होते. या पार्श्वभूमीवर ग्रेनेडसहीत या जवानाला अटक होणं म्हणजे एक मोठी दुर्घटना टळल्याचे बोललं जात आहे.
J&K: Army jawan carrying 2 grenades arrested by police at Srinagar airport. More details awaited. pic.twitter.com/VUPrZAOxE0
— ANI (@ANI_news) April 3, 2017
Jawan belongs to Darjeeling and has accepted he was carrying grenades, says it was for causing blast in rivers to catch fish:Army Sources
— ANI (@ANI_news) April 3, 2017