विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:00 PM2024-05-31T16:00:04+5:302024-05-31T16:00:39+5:30

विमान लँडिंग होताच सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Srinagar airport receives bomb 'threatening call' targeting Vistara flight | विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग

जम्मू-काश्मीर : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. यानंतर विमानाचे श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १७७ प्रवासी होते. 

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) श्रीनगर विमानतळावर 'धमकीचा कॉल' मिळाल्यानंतर सीआयएसएफने तत्काळ कारवाई केली आणि काही काळ विमानतळ बंद केले. यानंतर विस्तारा एअरलाइन्सचे विमान UK611 सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले.

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग होताच सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. विमानाची तपासणी केली असता त्यात काहीही आढळले नाही. हा धमकीचा फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर विमानतळाचे कामकाज सामान्यपणे सुरू झाले.

Web Title: Srinagar airport receives bomb 'threatening call' targeting Vistara flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.