श्रीनगर पोटनिवडणुकीवरून भारत, पाकमध्ये तणातणी
By admin | Published: April 10, 2017 11:49 PM2017-04-10T23:49:43+5:302017-04-10T23:49:43+5:30
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रविवारी झालेल्या हिंसाचारावरून पाकिस्तानने खोडसाळ वक्तव्य जारी केल्यान
इस्लामाबाद/ नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रविवारी झालेल्या हिंसाचारावरून पाकिस्तानने खोडसाळ वक्तव्य जारी केल्यान दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सोमवारी आणखी तणाव निर्माण झाला. पाकिस्तानने या निमित्ताने पुन्हा एकदा काश्मिरी जनतेस स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याचा मुद्दा मांडला. मात्र, भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये नाक न खुपसण्याची समज लगेचच पाकिस्तानला दिली.
श्रीनगरमध्ये मतदानादरम्यान झालेला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात इयत्ता १२ वीच्या एका विद्यार्थ्यांसह आठ नागरिक ठार झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नाक खुपसू नका
- पाकिस्तानच्या या वक्तव्याचा भारताने लगेच खरपूस समाचार घेतला. स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यापासून निम्म्याहून अधिक काळ लष्करी हुकूमशाहीत राहिलेल्या आणि लोकशाहीची जाणिवपूर्वक गळचेपी पाकिस्तानला लोकशाहीचा पुळका येऊन भारताला लोकशाहीचे धडे देण्याची गरज नाही.
- भारतात दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक
खुपसू नये, असे भारताने बजावले आहे.