श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 04:46 PM2018-02-26T16:46:39+5:302018-02-26T16:46:39+5:30

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला.

In Srinagar, a grenade attack by a woman in prostitution | श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला

श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला

Next

जम्मू-काश्मीर- श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. पुलवामा जिल्ह्यात महिलेच्या वेशात आलेल्या एका दहशतवाद्यानं पोलीस कॉन्स्टेबलवर ग्रेनेड हल्ला केला. परंतु या हल्ल्यात तो स्वतःच शिकार झाला असून, पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलीस कर्मचा-याला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मेहराजुद्दीन जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. परंतु महिलेच्या वेषातील एक दहशतवादी मुश्ताक अहमद चोपन ग्रेनेड हल्ल्यात जखमी झाला. महिलेचे कपडे घातलेला दहशतवादी मुश्ताक अहमदचा हल्ल्यात खात्मा झाला आहे. काश्मीर घाटीमध्ये सध्या 30 ते 40 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. लीपा घाटी, मंडल, रामपूर आणि इतर ठिकाणी हे दहशतवादी 30 ते 40च्या संख्येत असून, ते समूहानं राहत आहेत.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर जेव्हा गोळीबार करण्यात येतो, त्यावेळीच हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. कुपवाडा आणि तंगधारमध्ये अशाच प्रकारे दहशतवादी घुसले होते. गेल्या काही तासांपूर्वीच सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

या संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घातला होता. दरम्यान, परिसरात किती दहशतवाद्यांचा वावर आहे, याबाबती माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. घटनास्थळावरून सीआरपीएफच्या 45व्या बटालियनचे जवान आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून हे संयुक्त ऑपरेशन चालवण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील (22 फेब्रुवारी) जवानांनी हाजिन परिसरात 2-3 दहशतवाद्यांना घेरलं होतं. एका घरात लपलेले दहशतवादी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करत होते. या दरम्यान एक जवान गंभीर स्वरुपात जखमीदेखील झाला होता. 

Web Title: In Srinagar, a grenade attack by a woman in prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.