शहरात आज श्रीरामाचा रथ उत्सुकता शिगेला : मान्यवरांची उपस्थिती
By admin | Published: November 22, 2015 12:41 AM2015-11-22T00:41:23+5:302015-11-22T00:41:23+5:30
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रविवारी श्रीरामाचा रथ २२ रोजी निघणार असून रथोत्सवानिनित्ताने संस्थानकडून जय्यत तयारी झाली आहे. रथोत्सवाच्या पूजेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
Next
ज गाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रविवारी श्रीरामाचा रथ २२ रोजी निघणार असून रथोत्सवानिनित्ताने संस्थानकडून जय्यत तयारी झाली आहे. रथोत्सवाच्या पूजेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. १४३ वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामाच्या रथनिमित्ताने गेल्या १० दिवसांपासून विविध वहने निघत असल्याने मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. रोज या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम होत असत. संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत आहेत. पहाटे चार वाजेपासून सुरू होणार्या कार्यक्रमांची रात्री १२ वाजता रथ परतल्यानंतर होणार्या होणार्या महाआरतीने सांगता होईल. यांची असेल प्रमुख उपस्थितीजलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, उद्योगपती राजेश सुरेशदादा जैन, जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर सुनील महाजन, महापालिकेेचे विरोधी पक्ष नेेते वामनराव खडके, नगरसेवक ललित कोल्हे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, ब्रााण सभा अध्यक्ष ॲड.सुशील अत्रे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, श्रीकांत खटोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन झाल्यावर दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिर येथून रथास प्रारंभ होईल. (सविस्तर वृत्त हॅलो ३ वर)