एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांचा राजीनामा
By admin | Published: June 9, 2016 05:25 AM2016-06-09T05:25:39+5:302016-06-09T05:25:39+5:30
बिहार विद्यालय शालेय परीक्षा मंडळाचे (बीएसईबी) अध्यक्ष लालकेश्वरप्रसाद सिंग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
एस. पी. सिन्हा,
पाटणा- बिहार विद्यालय शालेय परीक्षा मंडळाचे (बीएसईबी) अध्यक्ष लालकेश्वरप्रसाद सिंग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिक्षण विभागाने त्यांचा राजीनामा तडकाफडकी मंजूरही केला आहे. राज्यात गाजत असलेल्या १२ वी परीक्षेतील टॉपर घोटाळ्याच्या संदर्भात मंगळवारी बोर्ड कार्यालयावर छापा घालण्यात आला होता.
त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री अशोककुमार चौधरी यांनी दिली. तत्पूर्वी सिंग यांना शिक्षण विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली होती आणि २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. सिंग यांचा कार्यकाळ १४ जून २०१७ रोजी संपणार होता, परंतु टॉपर वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. लालकेश्वरप्रसाद सिंग यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे.
टॉपर घोटाळ्याच्या संदर्भात एसआयटीच्या हाजीपूरच्या जीए इंटर स्कूलच्या केंद्र अधीक्षिका शैलकुमारी यांना ताब्यात घेतले. त्यांना पाटणा येथे आणण्यात आले असून, कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. परीक्षेदरम्यान विशून राय कॉलेजतर्फे जी कॉपी पुरविण्यात आली होती, त्या कॉपीत व बोर्डाने तपासलेल्या कॉपीत बराच फरक आहे, असा खुलासा शैलकुमारी यांनी केला.