JOB Alert : मस्तच! 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती; मिळणार 69 हजार पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 04:06 PM2021-07-17T16:06:31+5:302021-07-17T16:09:53+5:30

SSC GD Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनने यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 

SSC GD Notification 2021 staff selection commission capf nia ssf assam rifles applications begin | JOB Alert : मस्तच! 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती; मिळणार 69 हजार पगार

JOB Alert : मस्तच! 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती; मिळणार 69 हजार पगार

googlenewsNext

नवी दिल्ली - स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 

इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

पदं

बीएसएफ: 7545
सीआयएसएफ : 8464
एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431
आसाम रायफल्स: 3785
एसएसएफ: 240

पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करू शकतात.

पगार

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700 ते 69100 रुपये पगार मिळणार आहेत.

अर्ज कुठे करायचा?

स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: SSC GD Notification 2021 staff selection commission capf nia ssf assam rifles applications begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.