सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचारी संपावर; सौराष्ट्रात प्रवाशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:08 PM2019-02-21T18:08:23+5:302019-02-21T18:08:45+5:30
गुरुवारी सौराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
राजकोट : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य 9 मागण्यांसाठी गुजराचे एसटी कर्मचारी संपावर गेले असून यामुळे सौराष्ट्रातील वाहतूक ठप्प झाली होती. कर्मचारी कामावर न आल्याने एसटी विभागाला अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
गुरुवारी सौराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. जवळपास 50 हजार विद्यार्थी आणि दीड लाख प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुटालूट सुरु होती.
या विभागातील 512 आणि 198 एक्स्प्रेस बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्वाधिक समस्या ऑनलाईन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्भवली. या संपामध्ये 3 कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. अनुचित घटना न घडण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
कर्मचाऱ्यांच्या 9 मागण्या
सातव्या वेतन आयोगासह 9 मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. खोट्या केसेस मागे घेणे, एसटी कर्मचाऱ्यांना वर्ग 3 ऐवजी वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. ती मागे घ्यावी, अशा मागण्या आहेत.