एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

By Admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:46+5:302016-07-18T23:32:46+5:30

जळगाव : एस.टी. महामंडळाच्या २ बसेस् एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वावडदा-वडली रस्त्यावर घडली. या अपघातात दोन प्रवासी ठार तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती लक्षात घेता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

S.T. Two buses collided with Mahamandal, two dead and 25 passengers injured in a road accident on the Vadwad-Vadli road; Due to the increase in the number of dead | एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

googlenewsNext
गाव : एस.टी. महामंडळाच्या २ बसेस् एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वावडदा-वडली रस्त्यावर घडली. या अपघातात दोन प्रवासी ठार तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती लक्षात घेता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
वावडदा गावापासून वडली गावाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर १ किलोमीटर अंतरावर तीव्र वळण असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. सोमवारी सायंकाळी ५ वाजता जळगाव आगाराची (एमएच १४ बीटी २६९९) क्रमांकाची जळगाव-पाचोरा ही बस वावडदा येथून पाचोरा जाण्यासाठी मार्गस्थ झाली. १ किलोमीटर अंतरावर ही बस व समोरून येणारी चाळीसगाव आगाराची (एमएच २० बीएल ३५०७) क्रमांकाची चाळीसगाव-जळगाव ही बस समोरासमोर एकमेकांवर जोरात आदळल्या. ज्या ठिकाणी हा अपघातात झाला; तेथे रस्त्यावर तीव्र स्वरुपाचे वळण आहे. साधारणपणे हे वळण ६० अंशाइतके आहे. वळणावर झाडांमुळे समोरून येणार्‍या वाहनाचा अंदाज दोन्ही बसेस्च्या चालकांना न आल्यानेच हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसेस्च्या चालकाची बाजू पूर्णपणे चेपली गेली. दोन्ही बसेस् एकमेकांवर आदळल्यामुळे वावडदा ते वडली हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.
सागाची झाडे धोकेदायक
ज्या ठिकाणी हा अपघात झाला; तेथे वळणावर शेताच्या बांधावर उंच सागाची झाडे एका ओळीत लावलेली आहेत. दुसर्‍या बाजूलादेखील रस्त्याच्या दुतर्फा लिंबाची झाडे आहेत. झाडांमुळेच दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना समोरून कोणते वाहन येत आहे, याचा अंदाज येत नाही. दोन्ही बसेस्च्या चालकांनाही वाहनांचा अंदाज न आल्यानेच हा अपघात झाला.
मदतकार्यासाठी धावले ग्रामस्थ
या अपघाताची माहिती मिळताच, वावडदा, शिरसोली, वडली, जळके, डोमगाव व पाथरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. काहींनी भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळवली. तर काहींनी १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिकेला बोलावले. दोन्ही बसेस्मधील जखमींना १०८ क्रमांकाच्या ४ रुग्णवाहिकांद्वारे उपचारासाठी जळगावात हलविण्यात आले. अपघातानंतर अर्ध्या तासाच्या कालावधितच मिळेल त्या वाहनाने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत होते.

Web Title: S.T. Two buses collided with Mahamandal, two dead and 25 passengers injured in a road accident on the Vadwad-Vadli road; Due to the increase in the number of dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.