सेंट झेवियर संघ दिल्लीला रवाना

By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:30+5:302016-09-22T01:16:30+5:30

म्हापसा : नवी दिल्ली येथे होणार्‍या सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी मयडे येथील सेंट झेवियर हायस्कूल संघ बुधवारी (दि.21) दिल्लीला रवाना झाला. ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असेल. 14 वर्षांखालील ज्युनियर गटात या विद्यालयाने राज्यस्तरावरील विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ते पात्र ठरले आहेत. रेल्वेमार्गे हा संघ थिवी येथून रवाना झाला. संघ प्रशिक्षक शेखर केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. संघ येथे चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर स्टेडियम तसेच वेलिंग्टन पार्क येथे सामने खेळवण्यात येतील. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची पहिल्यांदाच संधी प्राप्त झालेल्या या स्कूलचे मडये क्षेत्रात अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

St. Xavier's team leaves for Delhi | सेंट झेवियर संघ दिल्लीला रवाना

सेंट झेवियर संघ दिल्लीला रवाना

Next
हापसा : नवी दिल्ली येथे होणार्‍या सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी मयडे येथील सेंट झेवियर हायस्कूल संघ बुधवारी (दि.21) दिल्लीला रवाना झाला. ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असेल. 14 वर्षांखालील ज्युनियर गटात या विद्यालयाने राज्यस्तरावरील विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ते पात्र ठरले आहेत. रेल्वेमार्गे हा संघ थिवी येथून रवाना झाला. संघ प्रशिक्षक शेखर केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. संघ येथे चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर स्टेडियम तसेच वेलिंग्टन पार्क येथे सामने खेळवण्यात येतील. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची पहिल्यांदाच संधी प्राप्त झालेल्या या स्कूलचे मडये क्षेत्रात अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
फोटो : मयडे येथील सेंट झेवियर हायस्कूलचा संघ. (2109-एमएपी-26)

Web Title: St. Xavier's team leaves for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.