हॉकर्सच्या हाणामारीत दुकानावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 12:30 AM2016-04-29T00:30:55+5:302016-04-29T00:30:55+5:30

जळगाव: जुन्या कापड बाजारात गुरुवारी संध्याकाळी विजय सुरेश मोरे या व अन्य एक अशा दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात योगेश इलेक्ट्रीकल्स व चौबे हाऊस या दुकानाच्या दिशेन दगडफेक झाल्याने दुकानातील शोकेसच्या काचा फुटल्या आहेत.यावेळी तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हाणामारी करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले.

Stacked stones at the shop of the Hawker | हॉकर्सच्या हाणामारीत दुकानावर दगडफेक

हॉकर्सच्या हाणामारीत दुकानावर दगडफेक

Next
गाव: जुन्या कापड बाजारात गुरुवारी संध्याकाळी विजय सुरेश मोरे या व अन्य एक अशा दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात योगेश इलेक्ट्रीकल्स व चौबे हाऊस या दुकानाच्या दिशेन दगडफेक झाल्याने दुकानातील शोकेसच्या काचा फुटल्या आहेत.यावेळी तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हाणामारी करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले.
सुभाष चौक परिसरातील हॉकर्स हटविण्यात आल्यानंतर काहीजण जुना कापड बाजारात दुकानांसमोर आपल्या हातगाड्या सुरुवात केली आहे, त्यास दुकानदारांचा विरोध आहे. गुरुवारी विजय मोरे व एका हॉकर्समध्ये हाणामारी झाली. त्यात मोरे याने समोरच्या तरुणाच्या दिशेन भिरकावलेले दगड योगेश इलेक्ट्रीकल्स व चौबे हाऊसमध्ये गेले. त्यात दोन्ही दुकानातील काच फुटून दहा हजाराच्यावर नुकसान झाले. हाणामारी करणार्‍यांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेशकुमार पृथ्वीराज जैन यांच्या फिर्यादीवरुन विजय मोरे याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.

वाळूच्या डंपरची दुचाकीला धडक
जळगाव: वाळूने भरलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड ७४७४) संत गाडगेबाबा चौकात दुचाकीला (एम.एच.१९ सी.ई.४१) धडक दिल्याने डंपर चालक भूषण अशोक बोरसे व दुचाकीस्वार सतीश विलास तायडे या दोघांमध्ये गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता वाद झाला होता. दुचाकीस्वार हा स्वत:हूनच डंपरच्या पुढे आला होता, असा आरोप बोरसे याने केला. दरम्यान, दोघं जण रामानंद नगर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथे आपसात वाद मिटविण्यात आला. तायडे व हटकर या दोन गटात यापुर्वीही वाद आहेत, त्यातूनच हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच वाळू वाहतुकीचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला.
पिग्मीच्या पैशावरून वाद
पांडे चौकात असलेल्या एस.टी.डी.,पी.सी.ओ.धारक पतसंस्थेचे कार्यालय बंद असल्याने तसेच त्यांचा पिग्मी एजंटही गायब झाल्याच्या संशयावरुन गुरुवारी दुपारी दीड वाजता ठेवीदार व संस्थाचालक यांच्यात वाद झाला. पुर्वी येथे पतसंस्थेचे कार्यालय होते, आता त्या जागी दुसरेच कार्यालय सुरू झाल्याने संस्था बंद पडल्याचा संशय व त्यातच पिग्मीचे पैसे गोळा करणारी व्यक्ती गायब झाल्याने हा वाद झाला. यावेळी राजेश मंडोरा व शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांच्यातही वाद झाला.नंतर संबंधित एजंटने पिग्मीचे सर्व पैसे परत केल्याने हा वाद आपसात मिटला.

Web Title: Stacked stones at the shop of the Hawker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.