कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे; ‘त्या’ अधिकाऱ्याला थेट घरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:41 IST2023-09-28T10:40:55+5:302023-09-28T10:41:28+5:30
दुग्गा, त्यांचे पती संजीव खिरवार यांची गेल्या वर्षी दिल्लीबाहेर बदली करण्यात आली होती

कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे; ‘त्या’ अधिकाऱ्याला थेट घरचा रस्ता
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्याला सरकारने सक्तीने सेवानिवृत्त केले आहे. रिंकू दुग्गा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या १९९४ च्या बॅचच्या अरुणाचल प्रदेश केडरच्या अधिकारी आहेत.
दुग्गा, त्यांचे पती संजीव खिरवार यांची गेल्या वर्षी दिल्लीबाहेर बदली करण्यात आली होती. अहवालात म्हटले होते की, आयएएस दाम्पत्याने त्यांच्या कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडूंना स्टेडियम रिकामे करण्यास सांगितले होते. खिरवार हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि सध्या ते लडाखमध्ये कार्यरत आहेत. केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम, १९७२ च्या नियम ४८ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.