Video - भाषण सुरू असताना पावसाचं रौद्र रुप; वादळी वाऱ्याने स्टेज कोसळला; नेतेमंडळी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 01:16 PM2023-07-12T13:16:34+5:302023-07-12T13:22:35+5:30

पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. वादळी वाऱ्याने स्टेज कोसळला. यामध्ये नेतेमंडळी किरकोळ जखमी झाले आहेत.

Stage collapses in Andhra Pradesh's Eluru district, around 10 TDP members sustain injuries | Video - भाषण सुरू असताना पावसाचं रौद्र रुप; वादळी वाऱ्याने स्टेज कोसळला; नेतेमंडळी जखमी

Video - भाषण सुरू असताना पावसाचं रौद्र रुप; वादळी वाऱ्याने स्टेज कोसळला; नेतेमंडळी जखमी

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेज कोसळताच त्यावर उभे असलेले आणि बसलेले सर्व नेते खाली पडत आहेत. या घटनेत सर्व नेते जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. तेलगू देसम पार्टीच्या एका जनसभेसाठी स्टेज तयार करण्यात आला होता. जेथे एन. चिन्नराजप्पा यांच्यासह पक्षाचे 10 नेते उपस्थित होते. 

पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. वादळी वाऱ्याने स्टेज कोसळला. यामध्ये नेतेमंडळी किरकोळ जखमी झाले आहेत. तेलगू देसम पार्टीचे प्रवक्ते के. पत्ताभी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 जून रोजी रात्री घडली आणि पक्षाच्या भविष्य़ासंबंधीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते एलुरु जिल्ह्यातील बत्तुलावारिगुडेम गावात आले होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. 

के. पत्ताभी यांनी पीटीआयला सांगितले की, स्टेज कोसळला. माजी गृहमंत्री चिन्नराजप्पा आणि एलुरुचे माजी खासदार मगंती बाबू यांना किरकोळ दुखापत झाली आणि चिंतामनेनी प्रभाकर यांनाही किरकोळ दुखापत झाली. प्रवक्त्यांनी सांगितलं की, सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे स्टेज कोसळल्याचे कारण त्यांनी दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

उत्तराखंडसह अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे मध्य प्रदेशातील तीन गंगोत्री यात्रेकरूंसह आठ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. पावसामुळे झालेले अपघात, भूस्खलन आणि पुरामुळे मंगळवारी आणखी 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासह, 8 जुलैपासून या भागातील मृतांची संख्या 91 वर गेली आहे.
 

Web Title: Stage collapses in Andhra Pradesh's Eluru district, around 10 TDP members sustain injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.