पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:21 AM2024-05-13T08:21:57+5:302024-05-13T08:22:59+5:30

६९५ उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती

stage five of lok sabha election 2024 23 percent of candidates criminal and proportion of women is only 12 percent | पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच 

पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मेरोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आठ राज्यांतील ४९ मतदारसंघांत एकूण ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १५९ (२३ टक्के) उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर २२७ (३३ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. तसेच सर्व उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच या केवळ ८२ महिला उमेदवार रिंगणात असून त्यांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. महिलांचे कमी प्रमाण या टप्प्यातही दिसत आहे.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

साधारण गुन्हे    १५९ 
गंभीर गुन्हे    १२२ 
महिलांविषयक गुन्हे    २९ 
खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे    २८ 
द्वेषपूर्वक विधान केल्याचे गुन्हे    १० 
खुनाशी संबंधित गुन्हे    ४
शिक्षा मिळालेले    ३

पक्षनिहाय गुन्हेगार उमेदवार
पक्ष    गुन्हे    गंभीर             गुन्हे
सपा    ५    ४
शिंदेसेना    ३    २
एमआयएम    २    २
भाजप    १९    १२ 
काँग्रेस    ८    ७
तृणमूल    ३    २
उद्धवसेना    ३    १
राजद    १    १
बीजेडी    १    ०

सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार

नाव मतदारसंघ (राज्य)    पक्ष    चल संपत्ती    अचल संपत्ती    एकूण संपत्ती
अनुराग शर्मा झांशी (उत्तर प्रदेश)    भाजप    ९५.२७ कोटी    ११६.८० कोटी    २१२.०७ कोटी
नीलेश सांबरे भिवंडी (महाराष्ट्र)    अपक्ष    ३२.७२ कोटी    ८३.३७ कोटी    ११६.०९ कोटी
पीयूष गोयल मुंबई उत्तर (महाराष्ट्र)    भाजप    ८९.८६ कोटी    २१.०८ कोटी    ११०.९५ कोटी
सर्वात कमी संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार
मो. सुलतान गनी बारामुल्ला (ज-का)    अपक्ष    ६७ रुपये    ० रुपये    ६७ रुपये
मुकेश कुमार मुझफ्फरपूर (बिहार)    अपक्ष    ७०० रुपये    ० रुपये    ७०० रुपये
सुरजित हेम्बराम हुगळी (प. बंगाल)    अपक्ष    ५,४२७ रुपये    ० रुपये    ५,४२७ रुपये

उमेदवारांचे शिक्षण तरी किती? 

अशिक्षित    ५
शिक्षित    २० 
५वी पास    २१ 
८वी पास    ६४ 
१०वी पास    ९७ 
१२वी पास    १११ 
डिप्लोमा    २६ 
पदवीधर    १४९ 
पदव्युत्तर पदवी    १२७ 
पीएच.डी.    ९

 

Web Title: stage five of lok sabha election 2024 23 percent of candidates criminal and proportion of women is only 12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.