रेल्वेच्या तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यास अटक

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:03+5:302016-03-11T22:26:03+5:30

जळगाव: विना परवानगी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून त्याची काळ्याबाजारात विक्री करणार्‍या ज्ञानेश्वर लक्ष्मण सपकाळे (वय ३५ रा.शाहू नगर, जळगाव) याला मुंबई रेल्वे सुरक्षा बलाच्या दक्षता पथकाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. लेवा बोर्डींगमधील मोरया टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानात या पथकाने छापा टाकला. दरम्यान, या कारवाईमुळे तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Stalker of railway ticket rider arrested | रेल्वेच्या तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यास अटक

रेल्वेच्या तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यास अटक

Next
गाव: विना परवानगी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून त्याची काळ्याबाजारात विक्री करणार्‍या ज्ञानेश्वर लक्ष्मण सपकाळे (वय ३५ रा.शाहू नगर, जळगाव) याला मुंबई रेल्वे सुरक्षा बलाच्या दक्षता पथकाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. लेवा बोर्डींगमधील मोरया टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानात या पथकाने छापा टाकला. दरम्यान, या कारवाईमुळे तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
जळगावमध्ये तिकीटाचा ऑनलाईन काळाबाजार होत असल्याची माहिती मुंबईच्या दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार मुंबईचे अतुल क्षीरसागर, भुसावळ रेल्वे सुरक्षा बल गुन्हे शाखेचे अतुल टोके, जळगाव रेल्वे सुरक्षा बलाचे गोकुळ सोनोनी व जिल्हा पेठ पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी एकत्र येवून लेवा बोर्डींगमधील मोरया टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानात छापा टाकला. यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांचा मोठा ताफा उपस्थित होता.
ई-तिकीट काढतांना पकडले
या दुकानात ज्ञानेश्वर लक्ष्मण सपकाळे हा त्याच्या वैयक्तिक संगणकावर ई-तिकिट काढतांना पथकाच्या अधिकार्‍यांना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे १२ ई-तिकिट व १० आरक्षित असे एकुण २२ तिकिटे मिळून आली. त्याची एकुण किंमत सत्तर हजार रुपये आहे. सपकाळे याला ताब्यात घेवून जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Web Title: Stalker of railway ticket rider arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.