मंचरला जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30

मंचर : शहरातील मटका आणि जुगार अड्ड्यांवर पुणे येथील गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला तसेच या वेळी १९ हजार ५०० रुपयंाची रोकड जप्त करण्यात आली. जुगार खेळणार्‍या ७ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Stampede on the gambling street | मंचरला जुगार अड्ड्यावर छापा

मंचरला जुगार अड्ड्यावर छापा

Next
चर : शहरातील मटका आणि जुगार अड्ड्यांवर पुणे येथील गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला तसेच या वेळी १९ हजार ५०० रुपयंाची रोकड जप्त करण्यात आली. जुगार खेळणार्‍या ७ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील हॉटेल शिवसागरच्या मागे जुगार आणि मटका व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी सोपान बाजीराव काळे, बंडू बाजीराव काळे, हेमंत चासकर, फिरोज मुनीर काझी, संतोष घोलप, जगदीश काशिनाथ काळे, वैभव कडुसेकर यांना मटका आणि जुगार खेळताना पकडण्यात आले. तसेच जुगार, मटक्याचे साहित्य आणि १९ हजार ५५० रुपये जप्त करण्यात आले.
यासंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पृथ्वीराज पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करत आहेत.
अवसरीत जुगार अड्ड्यावर छापा
मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे जुगार अड्ड्यावर मंचर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी ४ हजार ५० रुपये जप्त केले असून पत्ते खेळणार्‍या ५ जणावंर गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी खुर्द खडकमळा-मुंजोबा मंदिराजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मचंर पोलिसांनी छापा टाकून सुरेश बळवंत शिंदे, गणेश दत्तात्रय भोर, समीर रामचंद्र शिंदे, गुलाब ज्ञानेश्वर भोर, शिवाजी हरिभाऊ शिंदे आणि इतर जण जुगार खेळताना पकडले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पाच जणांवर तसेच इतर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची फिर्याद मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस विनोद गायकवाड यांनी दिली. गुन्‘ाचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीधर जगताप करत आहेत.

Web Title: Stampede on the gambling street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.