वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:19 AM2024-10-07T01:19:57+5:302024-10-07T01:24:11+5:30

लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांचा  आनंद लुटत असताना दुपारनंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला.

Stampede on beach in Chennai during Air Force airshow 5 killed 250 injured | वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

Chennai Marina Beach ( Marathi News ) : चेन्नईच्या मरिना बीचवर रविवारी ९२ व्या भारतीय वायुसेना दिनानिमित्त एअर शोचे आयोजन करण्यात आलं होतं. या एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना झाली असून शोसाठी मोठी गर्दी झाल्याने चेंगरा चेंगरी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला एअर शो पाहण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून असंख्य नागरिक मरिना बीचवर पोहचले होते. नागरिक वायुसेनेच्या विविध लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांचा  आनंद लुटत असताना दुपारनंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला.

दरम्यान, बीचवर झालेल्या गोंधळादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Web Title: Stampede on beach in Chennai during Air Force airshow 5 killed 250 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chennaiचेन्नई