वाराणसीच्या राजघाट ब्रिजवर चेंगराचेंगरी, २४ ठार
By admin | Published: October 15, 2016 03:33 PM2016-10-15T15:33:12+5:302016-10-15T18:52:08+5:30
वाराणसी जवळच्या राजघाट ब्रिजवर बाबा जय गुरुदेव सभेच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. १५ - वाराणसीच्या राजघाट ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बाबा जय गुरुदेव यांच्या कार्यक्रमा दरम्यान ही दुर्घटना घडली.
गंगा नदीच्या किना-यावर राजघाट ब्रिज आहे. ब्रिजवरुन शोभायात्रेची मिरवणूक जात असताना क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमासाठी तीन हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेण्यात आली होती. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त गर्दी जमा झाली होती.
बाबा जय गुरुदेव यांचा हा कार्यक्रम दोन दिवस चालणार होता. पूलावरुन मिरवणूक सुरु असताना गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनास्थळी चप्पल आणि पिशव्यांचा खच पडला आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरीकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
Deeply saddened by the loss of lives in the stampede in Varanasi. Condolences to the bereaved families. Prayers with those injured.
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2016
10 people killed in a stampede during Baba Jai Gurudev's sabha in Varanasi: IG zone SK Bhagat
— ANI UP (@ANINewsUP) October 15, 2016