तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:53 PM2022-04-12T14:53:35+5:302022-04-12T14:57:19+5:30

Tirumala Venkateswara Temple: मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम  तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती.

stampede situation due to heavy rush of pilgrims at tirumala temple in andhra pradesh three devotees injured | तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी

googlenewsNext

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील तिरुमाला व्यंकटेश्वरा (तिरुपती बालाजी) मंदिरात आज भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम  तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती.

आज तिरुपतीमधील तिन्ही तिकीट काउंटरवर प्रचंड गर्दी होती. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही भाविकांना विना तिकीट दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या परिस्थिती सामान्य असून भाविक आरामात देवाचे दर्शन घेत आहेत, असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (TTD) पीआरओ रवी कुमार यांनी सांगितले. 

वेळेत होतो बदल
तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरातील सर्वदर्शनम तिकीट सुविधेद्वारे सर्वांना मोफत दर्शन मिळते. मात्र, यामध्ये नंबर येण्यास बराच वेळ लागतो. मोफत सुविधेमुळे येथे अनेकदा मोठी रांग लागते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सर्वदर्शनमच्या वेळेत बदल होतो. इतर मंदिरांतील दर्शनाच्या पद्धतींपेक्षा यामध्ये नंबर येण्यास जास्त वेळ लागतो.


 
दरवर्षी लाखो भाविक येतात
कोरोनामुळे तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर गेल्या दोन वर्षांपासून भाविकांसाठी बंद होते. यावर्षी 14 मार्च रोजी तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिरुमाला वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. 

Web Title: stampede situation due to heavy rush of pilgrims at tirumala temple in andhra pradesh three devotees injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.